पाप्यास मान
सारा, पुण्यास कोंडमारा
परि सत्याचा हाती
दोरा, धरणेच बदल आहे
भेदास जन्म देती,
जाती अन जमाती
जाती बगैर नाती,
जुळणेच बदल आहे
दृष्टीत हिरवी
सृष्टी, करण्या गुलाब वृष्टी
शरीरास अपुल्या
कष्टी, करणेच बदल आहे
स्वार्थाचा भरला
डोह, पैशाचा उहा-पोह
प्रथम ‘स्व’ चा मोह, सरणेच बदल आहे
मिरविन
बॅंड-बाज्याशी, मागे टाकुन दुज़्याशी
स्पर्धा स्वत:
स्वत:शी, ठरणेच बदल आहे
आयुष्याचे गुज
ऎका, कळले आहे विवेका
जगण्यासाठी बरे
का, मरणेच बदल आहे
-- शब्दप्रेमी
(विवेक कापगते)
(विवेक कापगते)
9860399722