तुझी याद येता, भेटतो फुलांना
तुझे रूप समजून , छेडतो फुलांना
केस मोकळे जणू ... पाने वहीची
शब्द लिहून त्यावर , माळतो फुलांना
अर्पिती स्वतःला....देवाचिया चरणी
असा कसा अभ्यास, चुरगाळतो फुलांना
पुष्पगंधे सारे..... मोहरूनी जाती
गर्व सुगंधाचा , जाळतो फुलांना
तिला भासतो मी...काट्यांप्रमाणे
अरे फक्त मी सांभाळतो फुलांना
--- विवेक
तुझे रूप समजून , छेडतो फुलांना
केस मोकळे जणू ... पाने वहीची
शब्द लिहून त्यावर , माळतो फुलांना
अर्पिती स्वतःला....देवाचिया चरणी
असा कसा अभ्यास, चुरगाळतो फुलांना
पुष्पगंधे सारे..... मोहरूनी जाती
गर्व सुगंधाचा , जाळतो फुलांना
तिला भासतो मी...काट्यांप्रमाणे
अरे फक्त मी सांभाळतो फुलांना
--- विवेक