कागदी सीमांना लांघतो पावसाळा
हे विश्व एक आहे सांगतो पावसाळा
(लांघणे - ओलांडणे)
पशु पक्षी झाडे नाहतात अमृताने
अजुनी तनामनात रांगतो पावसाळा
तडजोड करत नाही, लाच घेत नाही
अहवाल पालिकेचा मांडतो पावसाळा
पेट घेत आहे थेंब थेंब पाणी
संसदेत गरजूनी भांडतो पावसाळा
रूसवा फुगवा अलगद भिजून जातो
होकार कुठून चोरून आणतो पावसाळा
पाणी जीवन आहे अजून नव्याने कळले
छपरावरी कुणाला टांगतो पावसाळा
-- विवेक
हे विश्व एक आहे सांगतो पावसाळा
(लांघणे - ओलांडणे)
पशु पक्षी झाडे नाहतात अमृताने
अजुनी तनामनात रांगतो पावसाळा
तडजोड करत नाही, लाच घेत नाही
अहवाल पालिकेचा मांडतो पावसाळा
पेट घेत आहे थेंब थेंब पाणी
संसदेत गरजूनी भांडतो पावसाळा
रूसवा फुगवा अलगद भिजून जातो
होकार कुठून चोरून आणतो पावसाळा
पाणी जीवन आहे अजून नव्याने कळले
छपरावरी कुणाला टांगतो पावसाळा
-- विवेक
No comments:
Post a Comment