मी जरी न बोललो
बोलेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
माझिया शब्दांस जर का
पंख कुणी टोचले
चुकून ते वा-यासवे
तिच्यापाशी पोचले
माझिया शब्दांस ती
ओठांवरी माळेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
व्याप सुखाचे सारे
आवरणे जमले नाही
दुःखाचे तिरके डोंगर
सावरणे जमले नाही
आधार होवूनी माझा
तोल सांभाळेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
मी जरी न बोललो
बोलेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
-- विवेक
२२ जून १७
बोलेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
माझिया शब्दांस जर का
पंख कुणी टोचले
चुकून ते वा-यासवे
तिच्यापाशी पोचले
माझिया शब्दांस ती
ओठांवरी माळेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
व्याप सुखाचे सारे
आवरणे जमले नाही
दुःखाचे तिरके डोंगर
सावरणे जमले नाही
आधार होवूनी माझा
तोल सांभाळेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
मी जरी न बोललो
बोलेल का?
जर तिच्यावर रूसलो
चालेल का?
-- विवेक
२२ जून १७
No comments:
Post a Comment