Tuesday, 17 October 2017

माझी आरू

मनात येईल तसे बोलते... माझी आरू
आभाळाच्या वरून चालते... माझी आरू

माझी आई, माझे बाबा... सारे माझे
नात्यांनाही गंध लावते..... माझी आरू

घास घास करून आपण चारून द्यावा
जगण्यालाही चव आणते... माझी आरू

गुड गर्ल मी आणि म्हणे तू बॅड बॉय हम्म
माझ्याशी रोज हेच भांडते... माझी आरू

नवा ड्रेस, नवी क्लिप, नव्या बांगड्या
ज्याला त्याला मटकून दावते... माझी आरू

धावता पळता पाय अडकतो.. पडून जाते
त्या जागेला लाथ मारते... माझी आरू

बडबड चिवचिव याला सांगा काय म्हणावे?
दाही दिशांना उर्जा वाटते... माझी आरू

तिज आठवता ओठांवरती हसू उमटते
असे वाटते लपून पाहते... माझी आरू

-- विवेक
   १८/०८/१७

No comments:

Post a Comment