Tuesday, 17 October 2017

4R कट्टा




तसं म्हटलं तर
आमचा देखील कट्टा आहे
कट्टा फक्त नावापुरता
कट्ट्याचीच थट्टा आहे

कधी हॅलो हाय नाही
आठवणींची साय नाही
'हॅपी बर्थ डे' म्हणवाच लागते
त्याला तरणोपाय नाही

मित्रांचा क्लास नाही
विशेष नाही खास नाही
एकमेका त्रास देण्याचा
गोड अट्टहास नाही

खरंच सगळे व्यस्त असतील ?
दुखानेच त्रस्त असतील
नाही नाही असं नाही
आपापल्या दुनियेत मस्त असतील

तसाही काय फरक पडतो
कुणालाही खंत नाही
असं वाटते कट्टा आता
कुणालाही पसंत नाही

असं वाटते कट्टा आता
कुणालाही पसंत नाही

--- कट्टयावरचाच एक

No comments:

Post a Comment