Tuesday, 17 October 2017

तुम्ही वेगळे नाही

फेशियल करूण आलात म्हणून वेगळे नाही
आतून कावळेच आहात, तुम्ही बगळे नाही

तिच्यापाशी जावून जरी सिद्ध करता सगळं
तिला दिसत नाही,तिचे डोळे उघडे नाही

तुमचं स्टेटस, तुमची इज्जत,तुमचेच अगणित प्रश्न
आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मोकळे नाही

सामान्य माणूस मंत्रालयात गेला,चक्कर येवून पडला
हिमालयातील घाटसुद्धा.....इतके वाकडे नाही

-- विवेक


No comments:

Post a Comment