इतकी गर्दी....कितीतरी जण मनात माझ्या
सारे मोकळे... नाही अडचण मनात माझ्या
धावणे-पळणे,हसणे-रडणे,उड्या मारणे
सवंगड्यांचे एक क्रीडांगण मनात माझ्या
वादळवारे, अफाट वृष्टी, कितीक विघ्ने??
बोटावरती जणू गोवर्धन मनात माझ्या
उगाच आता कशास भटकू इकडे तिकडे
विठू माऊली आणि गजानन मनात माझ्या
सारे मोकळे... नाही अडचण मनात माझ्या
धावणे-पळणे,हसणे-रडणे,उड्या मारणे
सवंगड्यांचे एक क्रीडांगण मनात माझ्या
वादळवारे, अफाट वृष्टी, कितीक विघ्ने??
बोटावरती जणू गोवर्धन मनात माझ्या
उगाच आता कशास भटकू इकडे तिकडे
विठू माऊली आणि गजानन मनात माझ्या
No comments:
Post a Comment