फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
ये ये.......आत ये
तुझी गाणं गात ये
शहाणपण फेकूनी
वेड्या या जगात ये
दोन शब्द अमृताचे
ओत तुझ्या कानात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
कुठलेही द्वार नाही
कुणी पहारेदार नाही
कायदा ना वायदा
कुठलेही सरकार नाही
कर भटकंती स्वैर
मुक्त या रानात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
त्या तिथे भिंतीवरी
स्वप्नं माझी टांगलेली
काही स्वताशी राखलेली
काही कुणाला सांगलेली
हरवून जा माझ्यासवे
माझिया स्वप्नात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
तळाशी या मनाच्या
कवितेचं झाडं आहे
माझ्याहूनी मी त्याला
जपलं जिवापाड आहे
दडलेली आहेस माझ्या
कवितेच्या पानात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
-- विवेक
०७ सप्टें १७
ये ना माझ्या मनात तू
ये ये.......आत ये
तुझी गाणं गात ये
शहाणपण फेकूनी
वेड्या या जगात ये
दोन शब्द अमृताचे
ओत तुझ्या कानात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
कुठलेही द्वार नाही
कुणी पहारेदार नाही
कायदा ना वायदा
कुठलेही सरकार नाही
कर भटकंती स्वैर
मुक्त या रानात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
त्या तिथे भिंतीवरी
स्वप्नं माझी टांगलेली
काही स्वताशी राखलेली
काही कुणाला सांगलेली
हरवून जा माझ्यासवे
माझिया स्वप्नात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
तळाशी या मनाच्या
कवितेचं झाडं आहे
माझ्याहूनी मी त्याला
जपलं जिवापाड आहे
दडलेली आहेस माझ्या
कवितेच्या पानात तू
फेरफटका मारायला
ये ना माझ्या मनात तू
-- विवेक
०७ सप्टें १७
No comments:
Post a Comment