Tuesday, 17 October 2017

ओंजळीत दान कर

ओंजळीत दान कर, माझे समाधान कर
दोन शब्द बोलना, भलेही अपमान कर

वेदना होणार नाही,जखमही होणार नाही
स्पर्श कर तू असा अन् मला बेभान कर

वादळाला अंग नसते अन् जळाला रंग नसते
सामावून माझ्यात आता,अस्तित्व कुरबान कर

सभ्यतेची वाढ नाही अन् जिभेला हाड नाही
तू तुझा हो आरसा, तू तुझा सन्मान कर

-- विवेक

No comments:

Post a Comment