Tuesday, 17 October 2017

आम्ही

ते सांगती अन् ठेवतो विश्वास आम्ही
स्वानुभावाचा सोडलाय ध्यास आम्ही

जन्मलो, मेलो... परी कळलेच नाही
दुग्ध समजूनी बैसलो पाण्यास आम्ही

लग्न,हुंडा,जाती, धर्म नैतिक आहे
अनैतिक ठरविले फक्त प्रेमास आम्ही

वर्तमानाविषयी चिंता फक्त इतकी
स्वर्ग नरकात गुंतवलाय श्वास आम्ही

भीती वाटते... दगड जर कंटाळले
मग कुठे शोधायचे देवास आम्ही

-- विवेक
   २९ जून १७

No comments:

Post a Comment