Tuesday, 17 October 2017

टकटक करतो आहे दारावर पावसाळा

---- तर
    टकटक करतो आहे दारावर पावसाळा
    भिजून घ्या...

गडगडाट करत येईल एखादा काळाभोर ढग
वीजेचा कडकडाट.... गंभीर होईल जग

कधी संथ धार, कधी टपो-या थेंबांचा मारा
न्हाहून निघतील घरे, रस्ते,धुळीने माखलेला वारा

वाहून जाईल सगळा आत दबलेला गाळ
पुन्हा एकदा कसं मोकळं होईल आभाळ

इंचभर का होईना
शक्यता असेल उंचावण्याची
भूजलाची पातळी

दाहक उन्हाने कोरडी होवून भेगाळलेली माती
चिखल होवून पुन्हा होईल गर्भार
नवे अंकुर फुटण्यासाठी

---- तर टकटक करतो आहे दारावर पावसाळा
    भिजून घ्या...


--- विवेक
     २७ जून १७

No comments:

Post a Comment