कविते...
अगं हे काय चाललयं तुझं
तू हे काय करत आहे
कधीचा बघतोय मी, तू अजूनही
त्याच जागी फिरत आहे.
एखाद्या डबक्यात साचून,
चार दोन खुरट्या वनस्पतींना
दोन प्रहर जगवण्यासाठी अथवा
येणा-या जाणा-यांचे पाय
रूतावेत, फसावेत तुझ्या चिखलात
म्हणून तुझा जन्म झालेला नाही
तर...
अंतकरणाच्या हिमालयातील
करूणारूपी गंगोत्रीमधून
निर्मळ अशा निर्झरासारखी निघालेली आहेस तू....
आणि एका विशाल सरितेत रूपांतरीत होवून
पाण्याने आसपासची भूमी सस्यश्यामल करीत
सागराशी एकरूप व्हायचेय तुला...
शब्दांचे डोंगर वा
आत्मस्तुतीच्या धरणाशी, न अडता
आणि सहानुभूती अथवा क्षणिक प्रेमाच्या
वाळूत लुप्त न होता
उंचावरून धबधब्यासारखे
फेसाळत, तुषार उडवत बेभान होवून काेसळायचेय तुला
आणि भानपूर्वक नेस्तनाभूत करायचेय
धर्म , लिंग, जातीभेदाच्या गावांना..
सुखाने नांदायला हवेत प्रेम, शांती व माणुसकीचे
अनेक बेट तुझ्या पात्रात..
तुलाच दूर करायचाच तुझ्या
मार्गातील अडथळा हरेक आणि
सर्वदूर रूजवायचाय तुला
तुझ्यातला विवेक....
कविते....
--- विवेक
१० सप्टें १७
अगं हे काय चाललयं तुझं
तू हे काय करत आहे
कधीचा बघतोय मी, तू अजूनही
त्याच जागी फिरत आहे.
एखाद्या डबक्यात साचून,
चार दोन खुरट्या वनस्पतींना
दोन प्रहर जगवण्यासाठी अथवा
येणा-या जाणा-यांचे पाय
रूतावेत, फसावेत तुझ्या चिखलात
म्हणून तुझा जन्म झालेला नाही
तर...
अंतकरणाच्या हिमालयातील
करूणारूपी गंगोत्रीमधून
निर्मळ अशा निर्झरासारखी निघालेली आहेस तू....
आणि एका विशाल सरितेत रूपांतरीत होवून
पाण्याने आसपासची भूमी सस्यश्यामल करीत
सागराशी एकरूप व्हायचेय तुला...
शब्दांचे डोंगर वा
आत्मस्तुतीच्या धरणाशी, न अडता
आणि सहानुभूती अथवा क्षणिक प्रेमाच्या
वाळूत लुप्त न होता
उंचावरून धबधब्यासारखे
फेसाळत, तुषार उडवत बेभान होवून काेसळायचेय तुला
आणि भानपूर्वक नेस्तनाभूत करायचेय
धर्म , लिंग, जातीभेदाच्या गावांना..
सुखाने नांदायला हवेत प्रेम, शांती व माणुसकीचे
अनेक बेट तुझ्या पात्रात..
तुलाच दूर करायचाच तुझ्या
मार्गातील अडथळा हरेक आणि
सर्वदूर रूजवायचाय तुला
तुझ्यातला विवेक....
कविते....
--- विवेक
१० सप्टें १७
No comments:
Post a Comment