कुठल्या दिशेला भरकटताहेत माणसाचे विचार
विरोध दर्शवून भ्रष्टाचारास स्वतःच करिती भ्रष्टाचार
धावताहेत अशा शर्यतीत,ज्यात नाही कुणाचेच हित
प्रेमाची भावना सर्वांनी मातीखाली पुरली
रुपयापुढे माणुसकी हरली ,रुपयापुढे माणुसकी हरली ||१||
पैसा झालाय मोठा, माणूस ठरतोय खोटा
जीवन जणू व्यवहार, मुल्य नफा-तोटा
सत्तेची चढलीया तंद्री, झाले सारेच आत्मकेंद्री
भावनांचा पडलाय दुष्काळ, मनातली हिरवळ विरली
रुपयापुढे माणुसकी हरली,रुपयापुढे माणुसकी हरली||२||
दाखवुनी दमदाटी, सुरा खुपसती पाठी
हे सगळ कशासाठी ? केवळ पैशासाठी
पैसा म्हणजे राजस्व, पैसा म्हणजे सर्वस्व
रुपयासाठी माणस आता स्वाभिमान गमावून बसली
रुपयापुढे माणुसकी हरली,रुपयापुढे माणुसकी हरली||३||
-- शब्दप्रेमी

No comments:
Post a Comment