एक प्रयत्न.. संदीप खरे ह्यांच्या "देते कोण" च्या विडंबनाचा..
संदीप खरे यांची 'देते कोण?' हि रचना मी प्रार्थना किंवा परमेश्वराचे आभार म्हणून दररोज ऐकतो व गुणगुणतो. ऐकता ऐकता हळूहळू आपण म्हणजेच 'मानव' या निसर्गाचे काय करतोय हा विचार नेहमीच डोक्यात असायचा. त्यातूनच मिळालेला हा हुंकार... करते कोण.......
करते कोण.......
तरंगांच्या जाळामध्ये अडकली हवा
गडप होऊ पाहतोय पाखरांचा थवा
भावनांची माती अन मातीची या धूप
पालटले आहे साऱ्या निसर्गाचे रूप
करते कोण.......करते कोण.......
कधी ढगफुटी कधी पावसाला सुट्टी
ग्रीष्मात धरणीची होत आहे भट्टी
सागरातला वादळ गातो कर्कश गाणी
लागू पाहतेय इथे रोज आणीबाणी
करते कोण.......करते कोण.......
शस्त्र निर्मितीचा सारा पालटला हेतू
'नाम' विसरून जणू वागतात ऋतू
गाडीतून प्रवासात दिसती 'घरे पळती'
गंगाजलानेही राई-रोगा मिळे बढती
करते कोण.......करते कोण.......
रानातली हिरवळ रोज रोज वजा
छताविण चिंतातूर जंगलचा राजा
धृवावरील बर्फ वितळून पाणी
भविष्यातील काळोख स्पष्ट नभावाणी
करते कोण.......करते कोण.......
-- शब्दप्रेमी
(मूळ कविता - 'देते कोण' - संदीप खरे )
संदीप खरे यांची 'देते कोण?' हि रचना मी प्रार्थना किंवा परमेश्वराचे आभार म्हणून दररोज ऐकतो व गुणगुणतो. ऐकता ऐकता हळूहळू आपण म्हणजेच 'मानव' या निसर्गाचे काय करतोय हा विचार नेहमीच डोक्यात असायचा. त्यातूनच मिळालेला हा हुंकार... करते कोण.......
करते कोण.......
तरंगांच्या जाळामध्ये अडकली हवा
गडप होऊ पाहतोय पाखरांचा थवा
भावनांची माती अन मातीची या धूप
पालटले आहे साऱ्या निसर्गाचे रूप
करते कोण.......करते कोण.......
कधी ढगफुटी कधी पावसाला सुट्टी
ग्रीष्मात धरणीची होत आहे भट्टी
सागरातला वादळ गातो कर्कश गाणी
लागू पाहतेय इथे रोज आणीबाणी
करते कोण.......करते कोण.......
शस्त्र निर्मितीचा सारा पालटला हेतू
'नाम' विसरून जणू वागतात ऋतू
गाडीतून प्रवासात दिसती 'घरे पळती'
गंगाजलानेही राई-रोगा मिळे बढती
करते कोण.......करते कोण.......
रानातली हिरवळ रोज रोज वजा
छताविण चिंतातूर जंगलचा राजा
धृवावरील बर्फ वितळून पाणी
भविष्यातील काळोख स्पष्ट नभावाणी
करते कोण.......करते कोण.......
-- शब्दप्रेमी
(मूळ कविता - 'देते कोण' - संदीप खरे )
No comments:
Post a Comment