बलात्कार होतोय निसर्गाचा , दिसतेय जरी मला
एक झाड लावायची, हिम्मत नाही मला
उधळून लावतोय मी, पर्यावरणाचा साज
कचरा दूर सारण्याची, वाटतेय मला लाज
कधीचा फांदीवर लटकतोय,परी नाही पिकलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय शिकलो ?
दोन पावलं चालणे, मला नाही जमत
मर्यादित साधनसंपत्तीची,
मला नाही किंमत
दाखवाया आपल्या, दिमागाचा नूर
सिगारेट ओढून सोडतोय हवेत, काळजाचा
धूर
आनंद साजरा करण्या, दारू प्यायला लागलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय शिकलो ?
मनाचा झालो कच्चा, जपू शकत नाही नाती
न सांगताच खातो, जातीसाठी माती
जे मी बोलेन, ते मी करणार नाही
जिथं नाही माझं स्वार्थ, तिथं डोके घालणार नाही
कर्तव्याच्या रिंगणात
कुठेच नाही टिकलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय शिकलो ?
माणसांसाठी आता मजजवळ , उरला नाही वेळ
चालू असतात आता, माशिनिबरोबर खेळ
भावनांचा पडला दुष्काळ, मनी विचारांचा गुंता
वर्तमानात जगन सोडून, करतोय भविष्याची
चिंता
क्षणोक्षणी चुकलो, खऱ्या आनंदाला मुकलो
शिक्षण घेऊन सुद्धा मी काय शिकलो ?
--शब्दप्रेमी
No comments:
Post a Comment