सरकारी नोकरीत आल्यानंतर पाहिलेली तिथली परिस्थिती, इतरांची माझ्याशी असलेली वागणूक यावर माझे विचार...............
दुष्काळ आता पाण्याचा पाहून बीजास वाटे
खडकाळ जमिनीत या रुजणे कठीण आहे
अतिरेक अस्वच्छतेचा चौफ़ेर काडी-कचरा
थंड होऊनी जळणे अग्नीस कठीण आहे
वाटेत खाच-खळगे आणिक सर्प विषारी
तोल सावरून आता चालणे कठीण आहे
समयाचं नाही भान नुसतीच दिरंगाई
T-२० खेळनाऱ्यास कसोटी कठीण आहे
परी बोचायाचे आहे काट्यास आज साऱ्या
फुलणे गुलाबाचे रोखणे कठीण आहे
----शब्दप्रेमी
Ekch no.
ReplyDeleteDhanyavad....
Delete