तुटून पडलेल्या
गुलाबाविषयी विचार करतोय
देठ
काय होईल? अचानक जर झाली आपली भेट
बघताच तुला नेत्रांच्या पुढती
हृदय स्पंदनी येईल भरती
आठवणींचे तोडूनी जाळे
मन नभावर घेईल फिरती
धन्यवाद देईन देवाला जरी झालाय थोड लेट
अचानक जर झाली आपली भेट
नयनात निळसर बघतच राहीन
केसांत मोकळ्या हरपून जाईन
संगे चालून दोन पावले
मीही तुजसम ठुमकून पाहीन
दोघांनी जरी नाही ठरविले, ठरेल अपुली डेट
अचानक जर झाली आपली भेट
मोक्याची या करीत प्रतीक्षा
लपुनि बसल्या मनात पंक्ती
नाते जोडण्या दिगंतरीचे
हळूच येतील ओठांवरती
लिहता-लिहता बोटे थकली, बोलणार मी थेट
अचानक जर झाली आपली भेट......
--विवेक कापगते
(शब्दप्रेमी)
काय होईल? अचानक जर झाली आपली भेट
बघताच तुला नेत्रांच्या पुढती
हृदय स्पंदनी येईल भरती
आठवणींचे तोडूनी जाळे
मन नभावर घेईल फिरती
धन्यवाद देईन देवाला जरी झालाय थोड लेट
अचानक जर झाली आपली भेट
नयनात निळसर बघतच राहीन
केसांत मोकळ्या हरपून जाईन
संगे चालून दोन पावले
मीही तुजसम ठुमकून पाहीन
दोघांनी जरी नाही ठरविले, ठरेल अपुली डेट
अचानक जर झाली आपली भेट
मोक्याची या करीत प्रतीक्षा
लपुनि बसल्या मनात पंक्ती
नाते जोडण्या दिगंतरीचे
हळूच येतील ओठांवरती
लिहता-लिहता बोटे थकली, बोलणार मी थेट
अचानक जर झाली आपली भेट......

--विवेक कापगते
(शब्दप्रेमी)
No comments:
Post a Comment