सरली ना राव पावसाची
वेटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त
मस्त वाटींग ॥धृ॥
काळे-काळे ढग एंट्री
जवा मारींग
मनाचा मोर नाच तवा
करींग
मातीचा गंध हवेत दाटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त
मस्त वाटींग ॥1॥
कागदी होड्या पाण्यात वाहींग
घराचे छत कुणी सुधारू
पाहींग
बळीराजा शेतीच्या कामात
जुटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त
मस्त वाटींग ॥2॥
तरूणांच्या डोक्यात
टिक-टिक वाजिंग
थेंबाच्या स्पर्शानं कलिका
लाजिंग
प्रेमाच्या बीजाला
अंकुर फुटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त
मस्त वाटींग ॥3॥
ऑफिस जरासं वाटतयं बोरिंग
सारेच सुट्टीची अपेक्षा
करिंग
गरमागरम भजी आणि एक
कटींग
मस्त मस्त वाटींग,मस्त
मस्त वाटींग ॥4॥
-- शब्दप्रेमी
-- शब्दप्रेमी
No comments:
Post a Comment