माझ्या स्वप्नात
तू का येतेस
?
हळूच मला पाहतेस
लपून
नजरेने तुझ्या टाकतेस
आसमंत व्यापून
वर्षासरींप्रमाणे तनामनावर
बरसतेस
माझ्या स्वप्नात तू
का येतेस ?
सौंदर्य तुझे न
उलगडणारे रहस्य
फुलुनी दिसे त्यावरी
तुझे स्मित हास्य
मादक नजरेने मला
घायाळ करतेस
माझ्या स्वप्नात तू
का येतेस ?
मोहून टाकलेस
तू शब्दांना साऱ्या
नामावाचून तुझ्या
वाटती कविता मज कोऱ्या
लिह्न्याचं माध्यम
मी, प्रत्यक्षात तूच लिहतेस
माझ्या स्वप्नात तू
का येतेस ?
- शब्दप्रेमी
No comments:
Post a Comment