Wednesday, 17 February 2016

स्वप्नात जरी आलीस


स्वप्नात जरी आलीस, मनात खळबळ माजते
मन मग स्वताशीच, तुझ्याप्रमाणेच लाजते

अथांग असा सागर, निळ्या-निळ्या डोळ्यात
सप्तरंगी  सूर ,     गोड-गोड गळ्यात
चाल तुझी बघून मनात छनछन वाजते
मन मग स्वताशीच, तुझ्याप्रमाणेच लाजते

टिपून तुझ्या लावण्याचे, मदमस्त रंग
दिपून जातात नेत्र ,भिजते सरीविना अंग
प्रणयाची भावना मग हळूच मनात रुजते 
मन मग स्वताशीच, तुझ्याप्रमाणेच लाजते

मोग-याचा रस चाखू पाहतोय भुंगा
नाहुन सुगंध रसात  फुलली शब्दगंगा
लिखाण तुझ्यावरचं , कविता म्हणून गाजते
मन मग स्वताशीच, तुझ्याप्रमाणेच लाजते



--- शब्दप्रेमी
(विवेक कापगते)
  986039972\

No comments:

Post a Comment