Wednesday, 17 February 2016

मला आता तुझी आठवणच येत नाही....

मला आता तुझी आठवणच येत नाही....


किती वेळ तुझी आता आठवण करत बसू
आठवण आली तरी चेहऱ्यावर फुलत नाही हसू
नाव तुझे कानी पडूनही लक्ष विचलित होत नाही 
मला आता तुझी आठवणच येत नाही

अंगावरून जरी गेल्या शीत वायू लहरा
नेत्रापुढे नसतो तुझा गोड गोड चेहरा
तुझे चित्र पाहण्यासाठी मी डोळेच मिटत नाही
मला आता तुझी आठवणच येत नाही

मोडून मोडून झालाय तुझ्या आठवणीचा कचरा
नाही पिसारा फुलवत मनाचा मोर नाचरा
लीह्ताना कविता तुझा विषयच येत नाही
मला आता तुझी आठवणच येत नाही....Emoji


---
विवेक
(
शब्दप्रेमी)

No comments:

Post a Comment