माझ्या मित्रा जरा घराबाहेर निघ
रस्त्यावरच दिसेल कच-याचा ढीग
डोक्यात येवू शकते कल्पना नवी
या ठिकाणी एक कचरापेटी हवी
....थांब...
अशी चूक करू नको
फालतू लफड्यात पडू नको
सगळं करून तरी तुला काय मिळेल लेका??
तुच घेतलाय का सा-या स्वच्छतेचा ठेका??
रस्त्यावरच दिसेल कच-याचा ढीग
डोक्यात येवू शकते कल्पना नवी
या ठिकाणी एक कचरापेटी हवी
....थांब...
अशी चूक करू नको
फालतू लफड्यात पडू नको
सगळं करून तरी तुला काय मिळेल लेका??
तुच घेतलाय का सा-या स्वच्छतेचा ठेका??
रस्त्यावरती घडतात रोज अपघात
मागू शकतो कुणी मदतीचा हात
तुझ्यातल्या माणूसकीला येवू शकते जाग
त्याला मदत करणे पडू शकते भाग
....थांब.....
अशी चूक करू नको
फालतू लफड्यात पडू नको
तुझ आणि त्याचं नातं तरी काय???
चौकशीच्या जाळ्यात अडकू शकतो पाय??
मागू शकतो कुणी मदतीचा हात
तुझ्यातल्या माणूसकीला येवू शकते जाग
त्याला मदत करणे पडू शकते भाग
....थांब.....
अशी चूक करू नको
फालतू लफड्यात पडू नको
तुझ आणि त्याचं नातं तरी काय???
चौकशीच्या जाळ्यात अडकू शकतो पाय??
सारेच करू लागलेत निसर्गाची हानी
डोळ्यावर झाकलेत आम्ही हात दोन्ही
चांगले विचार मनावरती पाडू शकतात धाड
मनास नक्कीच वाटेल लावावे एक झाड
....थांब.....
अशी चूक करू नको
फालतू लफड्यात पडू नको
झाड लावल्यावर त्याला पाणी कोण टाकेल??
तु लावशील झाड पण फळ दुसरा चाखेल??
चांगले विचार मनावरती पाडू शकतात धाड
मनास नक्कीच वाटेल लावावे एक झाड
....थांब.....
अशी चूक करू नको
फालतू लफड्यात पडू नको
झाड लावल्यावर त्याला पाणी कोण टाकेल??
तु लावशील झाड पण फळ दुसरा चाखेल??
No comments:
Post a Comment