Monday, 28 March 2016

मलाही स्वतःशी भांडावसं वाटतयं


खोटा खोटा खेळ मांडावसं वाटतयं
मलाही स्वतःशी भांडावसं वाटतयं

बदलावसं वाटतयं शब्दांचे अर्थ
शब्दच जणू खरे माणूस आहे व्यर्थ
स्वपनांना जात्यात कांडावस वाटतयं
मलाही स्वतःशी भांडावसं वाटतयं

विसरावसं वाटतयं जगण्याच कारण
मन म्हणते कर केवळ राजकारण
हरवलेलं काही धुंडावसं वाटतयं
मलाही स्वतःशी भांडावसं वाटतयं

वाढवावा वाटतयं स्वताचा इगो
सर्वांना म्हणाव मेरे पिछे भागो
गर्वाच्या घरात नांदावसं वाटतयं
मलाही स्वतःशी भांडावसं वाटतयं

-- विवेक(भांडखोर)
  तेवीस/सहा/पंधरा

No comments:

Post a Comment