KPIT Cummins मध्ये कामाला असताना 'सामाजिक जाणिव' म्हणून केपीआयटीने पुण्यापासून २० किमी अंतरावर 'कुसगाव' येथे एका शेतकऱ्याच्या डोंगराळ शेतीवर श्रमदानातून शेततळे बांधायचे हाती घेतले.त्याकरिता दर शनिवारी ४५-५० कामगार श्रमदानाकरिता कंपनीच्या खर्चातून कुसगावी जायचे व ३-४ तास काम करायचे.
आमची टीम जेव्हा गेली, तेव्हा त्यांना रस्त्यात मी ऐकवलेली हि कविता.
बघू तुम्हाला कशी वाटते.....
शेतात नाही पाणी, कल्पनाच भकास आहे
खोदायाचे शेततळे, मुद्दा झकास आहे
KPIT च्या कल्पनेला, दिली कामगारांनी दाद
कुसगावी श्रमदानाचे, ठरले निर्विवाद
खोदणार असले तळे, होणार नाही Leak
करावयाचे काम हे , Without any click
ना द्यावयाचे कुणा Updates , ना भरावयाची excel
मनास येईल तेथे, फोडा जमिनीचे pixel
खोदून असले तळे , समाधान मनास मिळे
आणि म्हणे कामगारांमध्ये, बंध भावनांचे जुळे
म्हणुनी विवेक म्हणे, जागला सर्वांचा 'विवेक'
एकावरी न थांबता, बनतील तळे अनेक
--शब्दप्रेमी
Apratim ...
ReplyDeleteधन्यवाद सोनाली...:-)
ReplyDelete