जगायचे
किती, म्हटलं बघाव मरून
एकडाव
वाटे,प्रेम घ्यावे मी करून
ऑफिसात
यावी अशी गोरी-गोरी परी
नजरेत
जादू तिच्या , खळी गालावरी
कळू नये तिला , मी पाहता चोरून
एकडाव
वाटे, प्रेम घ्यावे मी करून
अचानक
व्हावी मग तिची माझी भेट
भेटीला
असावे निमित्त प्रोजेक्ट
तिला येत 'बग ', द्यावे फिक्स मी करून
एकडाव
वाटे, प्रेम घ्यावे मी करून
हळू-हळू वाढेल आमचा संवाद
जेवताना
सोबत येईल वेगळाच स्वाद
बघूनच
तिला , पोट जावे माझे भरून
एकडाव
वाटे, प्रेम घ्यावे मी करून
मग एके दिवशी, दिवस तो यावा
घरी जाण्या आम्हा थोडा उशीरच व्हावा
गाडीवर
माझ्या,बसावी मला ती धरून
एकडाव
वाटे, प्रेम घ्यावे मी करून
मनातले
माझ्या तिला सांगेन सारे
लाजवी
ती , मला वाटावे बरे
चालावे
आम्ही, हात हातात धरून
एकडाव
वाटे, प्रेम घ्यावे मी करून
प्रेमात
तिच्या मी भिजेन चिंब
माझ्यात
दिसावे तिला तिचे प्रतिबिंब
सोबतीने
तिच्या जावे आयष्य सरून
एकडाव
वाटे, प्रेम घ्यावे मी करून
प्रेम
घ्यावे मी करून....
प्रेम
घ्यावे मी करून....
-- शब्दप्रेमी
No comments:
Post a Comment