शब्दप्रेमी
शब्दांत काय गोडी , शब्दांत काय सांगू , त्यांनाच हे कळाले, शब्दांत जे बुडाले...
Tuesday, 7 February 2017
------ *अशी वाटते* -------
खरं सांगू, कविता कशी वाटते
तुझी भेट झाली अशी वाटते
किती छान बोलून जातोस तू
मन टेकून घ्यावे अशी उशी वाटते
खोल खोल अगदी मनाच्या तळाशी
नेणारी वाट लहानशी वाटते
जाऊ दे आता सांगत नाही
जणू माझे स्वप्न मोरपिशी वाटते
-- विवेक कापगते,भंडारा
दोन/आठ/सोळा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment