साजणी का बांधली पायात ती चाळ तू
सारखी मारू नको मनावरती धाड तू
मी तसा खंबीर आहे, धीर आहे गंभीर आहे
फक्त तुझ्या डोळ्यातली आसवे सांभाळ तू
भेटलेलो या जगी लांब त्या क्षितिजापरी
मी असा धरतीपरी अन् टेकला आभाळ तू
राहुनी तुझिया सवे दु:ख देखील हासते
साधीभोळी दिसण्या अन् अंतरी द्वाड तू
वाळवंटी या जगी जर हवीशी सावली
हृदयाचे तवं अंगणी लाव माझे झाड तू
--विवेक कापगते, भंडारा
२५.०८.१६
No comments:
Post a Comment