Wednesday, 14 December 2016

---------- कर्ज -----------

तत्वांना जाळले मी, नियमांना मोडले मी
आता मनास माझ्या, बेभान सोडले मी


आता पुरे झाले, कुजके जुने बियाने
बीजे नवीन विवेकी, हृदयात गाडले मी


जुल्मी सा-या अदांचा, शोषून प्रीतगंध
कलिकेस पुन्हा भ्रमराच्या, प्रेमात पाडले मी


रंगीत भावनांचा, गोंगाट फार झाला
बासरीत एकतेच्या, सुरांना छेडले मी


जिथे प्रेम दिसले अन् आधार दिसला
अभिवादन करण्या, करांना जोडले मी


ओठांवरी जरी कधी तुझे नाव नसते
तुझे नाव मनातून कुठे खोडले मी??


तुला दाखविले अन् नेत्रे मला म्हणाली
कर्ज या देहाचे सव्याज फेडले मी


-- विवेक
०५.१२.२०१६

No comments:

Post a Comment