Wednesday, 14 December 2016

------- अस्तित्व -------

दंगलीच्या बीजाचे खरे सत्व आहे
हेच का देवा तुझे दिव्यत्व आहे?


नको डोकावूस जीवनात माझ्या
'भीती'ला इथे शून्य महत्व आहे


पुढे रामकृष्ण मागे कामक्रिडा
ह्याचेच का नाव साधूत्व आहे??


नोट मोजल्यावर मंजुरीला मुहुर्त
'सही'चे हेच सही कर्तुत्व आहे


तुझे लाजणे बघ असे जीवघेणे
गजलेचे जणू तू पालकत्व आहे


येत राहणार अशाच लाटांवर लाटा
सागराचे हेच तर अस्तित्व आहे


-- विवेक कापगते, भंडारा
०५.१२.२०१६

No comments:

Post a Comment