Wednesday, 14 December 2016

----- काटे हजार होते ------

काटे हजार होते, खोटे हजार होते
मी एकटाच छोटा, मोठे हजार होते


जाळूनी टाकले, माझ्या पिकांस त्यांनी
व्याधीच संपण्याचे , तोटे हजार होते


दंगली ब-याच झाल्या, मारपीट झाली
गर्दीत माणसांच्या , नेते हजार होते


रोकने ना जमले, हरवून यार गेलो
गालावरी खळीचे, साठे हजार होते


इतकी तुफान गर्दी, इतक्या तुफान टाळ्या
तू एकटीच म्हणजे, श्रोते हजार होते


-- विवेक
३०.११.१६

No comments:

Post a Comment