नात्यांचे फुल उमलत नसते मोजून मापून
त्याचे असणे नसणे होते सारे व्यापून
ठाऊक मजला बरसशील तू धोधो तेव्हा
शब्द माझे जेव्हा निघतील थोडे तापून
पतंग घेईल हवेत भिरक्या उनाड होवून
चला देवूया आपण त्याचे दोरे कापून
कवितेची बघ आता उरली एकच इच्छा
तिला वाटते मोहरून यावे तुझिया ओठून
तु ही आता जरा जराशी समजून घे ना
कविता म्हणजे हाक असते हृदयाच्या आतून
-- विवेक
त्याचे असणे नसणे होते सारे व्यापून
ठाऊक मजला बरसशील तू धोधो तेव्हा
शब्द माझे जेव्हा निघतील थोडे तापून
पतंग घेईल हवेत भिरक्या उनाड होवून
चला देवूया आपण त्याचे दोरे कापून
कवितेची बघ आता उरली एकच इच्छा
तिला वाटते मोहरून यावे तुझिया ओठून
तु ही आता जरा जराशी समजून घे ना
कविता म्हणजे हाक असते हृदयाच्या आतून
-- विवेक
No comments:
Post a Comment