Wednesday, 14 December 2016

------ करून टाकू ------

वाढत्या इगोचे चल मुंडण करून टाकू
'कलियुग आले आहे',खंडण करून टाकू 


सज्ज व्हा गड्यांनो अंधार पांघराया
पणती समान जळणे बंधन करून टाकू


संसदेत वाटे ऐसा ठराव मंजूर झाला
"जनभावना" खेळण्याचे साधन करून टाकू


'जात' म्हणजे आहे अस्सल नोट हजाराची
बंदी बंदी बंदी, मनावर गोंदण करून टाकू


प्रेम थोडे कमी झाल्यागत वाटत आहे
जवळ येण्यासाठी भांडण करून टाकू 


हसले म्हणजे चेह-यावर चमक वेगळी येते
हसणे म्हणजे आयुष्याचे इंधन करून टाकू


-- विवेक कापगते,भंडारा
तेरा/बारा/सोळा

No comments:

Post a Comment