Tuesday, 27 December 2016

----- काय मजाक आहे राव -----


तीचा वेळ व्यस्त आहे, काय मजाक आहे राव
 माझा वेऴ स्वस्त आहे, काय मजाक आहे राव

तरी तोल जात नाही तोलण्यातला बोलण्यातला
 अजबगजब शिस्त आहे, काय मजाक आहे राव

अमुच्या मधात साला, भांडण देखील आला नाही
 भांडण आपला दोस्त आहे, काय मजाक आहे राव

मोजू देत जगाला अमुच्या मनाची उंची
 मनात एव्हरेस्ट आहे, काय मजाक आहे राव

मैत्री म्हणजे कर्ज समजतो देवा तुझे या जीवनी
कविता माझी "किस्त" आहे, काय मजाक आहे राव

-- विवेक १९/१०/१६

No comments:

Post a Comment